Ad will apear here
Next
बोलू ‘बोली’चे बोल! - अहिराणी बोली (व्हिडिओ)
२०१९ या आंतरराष्ट्रीय स्थानिक भाषा वर्षाच्या निमित्ताने ‘बाइट्स ऑफ इंडिया’ने काही बोलीभाषांचा वेध घेणारा ‘बोलू ‘बोली’चे बोल!’ हा उपक्रम राबवला होता. लॉकडाउनच्या काळात वेळ हाताशी असताना रसिकांना बोलीभाषांचा गोडवा अनुभवता यावा, म्हणून बोलीभाषांच्या व्हिडिओची मालिका पुन्हा प्रसिद्ध करत आहोत. त्या मालिकेत आजचा व्हिडिओ अहिराणी बोलीभाषेचा. खानदेशात बोलल्या जाणाऱ्या बोलीतील कविता सादर करत आहेत ज्येष्ठ लेखक, कवी कमलाकर देसले...

(बोलीभाषांचा आढावा घेणारा ‘बोलू ‘बोली’चे बोल!’ हा लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)



खानदेशातली अहिराणी बोली म्हटलं, की पहिल्यांदा आठवतात त्या बहिणाबाई. जीवनाचं तत्त्वज्ञान सांगणाऱ्या त्यांच्या कवितांनी अहिराणी बोलीला मोठी प्रतिष्ठा मिळवून दिली. डॉ. रमेश सूर्यवंशी यांनी अहिराणी बोलीचा पहिला शब्दकोश अहिराणी-मराठी शब्दकोशाच्या रूपानं प्रसिद्ध केला. कमलाकर देसले यांच्यासारखे ज्येष्ठ लेखक/कवी मराठीसह अहिराणी बोलीतही लेखन करतात. अहिराणी बोलीत त्यांनी कविता, गझलाही लिहिल्या आहेत. अहिराणी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने देसले यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पसायदानाचा अहिराणी भाषेत ओवीबद्ध अनुवादही केला आहे. ‘जुन्या खानदेश परिसरात, म्हणजे अजिंठ्याचे डोंगर, सातपुड्याचे डोंगर, चांदवडचे डोंगर आणि तापी, बोरी, अनेर, वाघूर या नद्यांच्या प्रदेशात अहिर लोक वास्तव्यास असत. ते अहिराणी बोलत. अहिरांची भाषा म्हणून अहिराणी ओळखली जाते,’ अशी माहिती कमलाकर देसले यांनी दिली. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/GZSJCL
Similar Posts
बोलू ‘बोली’चे बोल! - वऱ्हाडी बोली - डॉ. प्रतिमा इंगोले (व्हिडिओ) २०१९ या आंतरराष्ट्रीय स्थानिक भाषा वर्षाच्या निमित्ताने ‘बाइट्स ऑफ इंडिया’ने काही बोलीभाषांचा वेध घेणारा ‘बोलू ‘बोली’चे बोल!’ हा उपक्रम राबवला होता. लॉकडाउनच्या काळात वेळ हाताशी असताना रसिकांना बोलीभाषांचा गोडवा अनुभवता यावा, म्हणून बोलीभाषांच्या व्हिडिओची मालिका पुन्हा प्रसिद्ध करत आहोत. त्या मालिकेत
बोलू ‘बोली’चे बोल! - मराठवाडी बोली (ऑडिओ) २०१९ या आंतरराष्ट्रीय स्थानिक भाषा वर्षाच्या निमित्ताने ‘बाइट्स ऑफ इंडिया’ने काही बोलीभाषांचा वेध घेणारा ‘बोलू ‘बोली’चे बोल!’ हा उपक्रम राबवला होता. लॉकडाउनच्या काळात वेळ हाताशी असताना रसिकांना बोलीभाषांचा गोडवा अनुभवता यावा, म्हणून बोलीभाषांच्या व्हिडिओची मालिका पुन्हा प्रसिद्ध करत आहोत. त्या मालिकेत
बोलू ‘बोली’चे बोल! - वऱ्हाडी बोली - डॉ. विठ्ठल वाघ (ऑडिओ) २०१९ या आंतरराष्ट्रीय स्थानिक भाषा वर्षाच्या निमित्ताने ‘बाइट्स ऑफ इंडिया’ने काही बोलीभाषांचा वेध घेणारा ‘बोलू ‘बोली’चे बोल!’ हा उपक्रम राबवला होता. लॉकडाउनच्या काळात वेळ हाताशी असताना रसिकांना बोलीभाषांचा गोडवा अनुभवता यावा, म्हणून बोलीभाषांच्या व्हिडिओची मालिका पुन्हा प्रसिद्ध करत आहोत. त्या मालिकेत
बोलू ‘बोली’चे बोल! - वैदर्भीय बोली (व्हिडिओ) २०१९ हे संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय स्थानिक भाषा वर्ष म्हणून घोषित केले होते. त्या वर्षाचा आता समारोप होत आहे. या वर्षाच्या निमित्ताने ‘बाइट्स ऑफ इंडिया’ने महाराष्ट्रातील काही बोलीभाषांचा वेध घेणारा ‘बोलू ‘बोली’चे बोल!’ हा उपक्रम राबवला होता. त्या बोलीभाषांच्या व्हिडिओच्या मालिकेत आजचा व्हिडिओ वैदर्भीय बोलीचा

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language